कमी उंचीच्या मुलींनी अशी हेअरस्टाईल करावी ज्यामुळे त्यांचा चेहरा लांब दिसेल आणि उंचीलाही एक बॅलन्स मिळेल. तुम्ही अशा प्रकारची हाय बन हेअरस्टाईल ट्राय करू शकता.
हाय पोनीटेल कमी उंचीच्या मुलींवर खूप स्टायलिश दिसते. जर तुमचे केस कलर केलेले असतील, तर तुम्ही अशा प्रकारची हाय पोनीटेल हेअरस्टाईल करून केस मागून स्ट्रेट करू शकता.
कलर केलेल्या केसांमध्ये अशाप्रकारे सॉफ्ट कर्ल्स करून तुम्ही मागच्या बाजूला हाय पोनीटेल बांधा. समोरून फ्लिक्स काढा, यामुळे चेहऱ्याला एक परफेक्ट शेप मिळेल आणि उंचीही जास्त दिसेल.
जर तुम्हाला अंबाडा घालता येत नसेल तर एक पोनीटेल बांधून तुम्ही डोनट बन लावा. त्याच्या आजूबाजूला सर्व केस पसरवून वेणी घालून त्याला गुंडाळा. तुमचा हाय बन तयार होईल.
एखाद्या फंक्शनमध्ये तुम्हाला हाय पोनीटेल बांधून तुमची उंची जास्त दाखवायची असेल, तर डोक्याच्या मध्यभागी एक उंच पोनीटेल बांधा आणि तुमच्या केसांना कर्ल्स करून ते मोकळे सोडा.
कमी उंचीच्या मुलींवर मेसी बन खूप स्टायलिश दिसतो. जर तुमचे केस थोडे कुरळे असतील, तर तुमचे केस एकत्र करून हेअर टायच्या मदतीने हाय बन बांधा आणि समोरून काही फ्लिक्स काढा.
पार्टीमध्येही तुम्ही हाय पोनीटेल हेअरस्टाईल करून ग्रेसफुल लूक मिळवू शकता. सर्वात आधी समोरून एक पफ बनवा, काही फ्लिक्स काढा. मागे कर्ल्स करून एक हाय पोनीटेल बांधा आणि पर्ल लावा.
ही रोजच्या वापरातील पटकन होणारी हेअरस्टाईल आहे. तुमचे केस मध्यभागी भांग पाडून मागे हाय बन बांधा आणि समोरून एक हेअर बँड लावून त्याला एक क्यूट लूक द्या.