उन्हात शरीराचे तापमान वाढलेले असते, आणि घामाद्वारे शरीर थंड होण्याचा प्रयत्न करत असते. अचानक एसीच्या थंड हवेत गेल्यास शरीराचा तापमान जलद गतीने खाली जातो.
Image credits: Pinterest
Marathi
रक्ताभिसरणावर (Blood Circulation) परिणाम
गरम तापमानात रक्तवाहिन्या फुगतात, त्यामुळे रक्ताभिसरण वेगवान होते. थंड वातावरणात अचानक गेल्यास रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे ब्लड प्रेशरमध्ये चढ-उतार होऊ शकतो.
Image credits: Pinterest
Marathi
हृदयावर होणारा ताण
हृदयाला शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. गरम वातावरणातून थंडीत गेल्यास हृदयावर अचानक ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
Image credits: Pinterest
Marathi
त्वचेसाठी हानिकारक
उन्हात असताना त्वचेच्या रोमछिद्रांमधून घाम बाहेर पडतो, त्यामुळे त्वचा मऊ होते. एसीच्या थंड हवेमुळे त्वचा अचानक कोरडी होते.
Image credits: Pinterest
Marathi
सर्दी आणि घशाच्या संसर्गाचा धोका
गरम वातावरणातून थंड ठिकाणी गेल्यास शरीराचा इम्युनिटी सिस्टम (रोगप्रतिकारक शक्ती) कमकुवत होतो, ज्यामुळे सर्दी, घसा दुखणे, किंवा व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते.
Image credits: Pinterest
Marathi
काय करावे?
उन्हातून आल्यावर थोडा वेळ सावलीत किंवा नॉर्मल तापमानाच्या ठिकाणी थांबा. पंख्याखाली बसून शरीर हळूहळू थंड होऊ द्या. थंड पाणी पिऊ नका, त्याऐवजी कोमट पाणी किंवा लिंबूपाणी घ्या.
Image credits: Pinterest
Marathi
निष्कर्ष
थेट उन्हातून एसीमध्ये गेल्यास तापमानातील अचानक बदलामुळे शरीरावर ताण येतो आणि विविध आजार उद्भवू शकतात. म्हणून, हळूहळू शरीराला तापमान बदलासाठी वेळ द्यावा.