आपण कुठंही फिरायला गेलात तर हॉटेलची निवड करणं आवश्यक असत. अशावेळी हॉटेलमध्ये राहण्यासाठी सोयी सुविधा कशा आहेत ते सर्वात आधी तपासून पाहिलं जात.
चेकइन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता लॉग आउट केलं जात, दुपारीच का लॉग आउट केलं जात, हा प्रश्न आपल्याही मनात अनेकवेळा आला असेल.
हॉटेलमध्ये रूम बुक केल्यानंतर १२ तासांचे पैसे भरावे लागतात. पण ती रम दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजायच्या आतमध्येच खाली करून द्यावी लागते.
आपण रात्री ११ वाजता हॉटेलमध्ये गेलात तरी दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता रूम खाली करावी लागते. त्यामुळे अनेकवेळा पर्यटकांना नवीन समस्यांचा सामना करावा लागतो.
आपण दुपारी १२ वाजता रूम खाली केल्यास दुसऱ्या ग्राहकाला स्वच्छ रूम दिली जाते. त्यामुळे येणारा नवीन ग्राहक हा हॉटेल मॅनेजमेंटवर चिडचिड करत नाही.
दुपारी १२ वाजता रूम खाली केल्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटला त्याचा फायदा होतो. खाली केलेल्या सर्व रूमची एकाच वेळी साफ सफाई करता येते.
एखाद्या ग्राहकाने रात्री १२ वाजता लॉग इन केल्यास त्याला दुसऱ्या दिवशी लवकर उठणे शक्य होत नाही. अशावेळी दुपारी १२ वाजता हॉटेलमधून बाहेर पडणे त्याला सोपं पडून जात.