Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
गाजर खाण्याचे फायदे
थंडीच्या दिवसात गाजराचे भरपूर प्रमाणात सेवन केले जाते. यामुळे शरिरातील रक्त वाढण्यास मदत होते. याशिवाय ज्या व्यक्तींचे हिमग्लोबीन कमी असते त्यांनी थंडीत गाजर व बीटाचा ज्यूस प्यावा.
Image credits: Social Media
Marathi
कोणत्या व्यक्तींनी खाऊ नये?
गाजर आरोग्यासाठी भले फायदेशीर असला तरीही काही व्यक्तींनी खाणे टाळावे. याबद्दलच पुढे जाणून घेऊया...
Image credits: freepik
Marathi
पोट बिघडल्यास
एखाद्याचे पोट बिघडले असल्यास गाजराचे सेवन करणे टाळावे. यामध्ये अत्याधिक प्रमाणात फायबर असल्याने पचनास थोडा वेळ लागतो.
Image credits: Social media
Marathi
बिघडते पचनक्रिया
गाजराचे सेवन केल्यानंतरच पचण्यासाठी पचनक्रिया सुरळीत असणे फार महत्वाचे असते. मळमळ किंवा छातीत जळजळ करत असल्यास पचनक्रिया मंदावली जाते. अशातच गाजराचे सेवन करणे टाळावे.
Image credits: social media
Marathi
मधुमेहाचे रुग्ण
मधुमेहाच्या रुग्णांनी गाजराचा ज्यूस पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण गाजरामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण अत्याधिक असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होऊ शकते.
Image credits: Freepik
Marathi
गाजराचे अत्याधिक सेवन करण्याचे नुकसान
हेल्दी राहण्यासाठी बहुतांशजण गाजराचे अत्याधिक प्रमाणात सेवन करतात. पण फायबरचे अधिक सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते.
Image credits: freepik
Marathi
गाजराचा ज्यूस
गाजराचा ज्यूस प्यायल्याने शरिरात रक्तवाढ होण्यास मदत होते. याशिवाय गाजराच्या ज्यूसमध्ये आवळा, पुदीना आणि बीटही मिक्स करू शकता. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल.
Image credits: Social Media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.