Marathi

उशी किती दिवसांनी बदलावी? कव्हर किती वेळा धुवावं?

Marathi

उशीचं कव्हर कधी आणि का बदलावं?

उशीची क्वालिटी, तिची स्वच्छता आणि ती बदलण्याची वेळ, या तिन्ही गोष्टी तुमच्या त्वचेवर, केसांवर आणि पाठीच्या आरोग्यावर थेट परिणाम करतात.
Image credits: Freepik
Marathi

उशी बदलण्याची योग्य वेळ कोणती?

उशी दाबल्यावर फुगत नसेल, तिचा आकार बदलला असेल, वास येत असेल किंवा मान दुखत असेल, तर नवीन उशी घेण्याची वेळ आली आहे.
Image credits: Freepik
Marathi

एका उशीचं आयुष्य किती असतं?

फायबर आणि पॉलिस्टरच्या उशा साधारणपणे एक ते दीड वर्ष टिकतात. तर मेमरी फोम आणि लॅटेक्सच्या उशा त्यापेक्षा जास्त काळ चालतात.
Image credits: social media
Marathi

उशीचं कव्हर बदलणं का गरजेचं आहे?

उशीप्रमाणेच तिचं कव्हरही तुमच्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्याशी संबंधित असतं. त्वचा तज्ज्ञ दर ३-४ दिवसांनी कव्हर बदलण्याचा सल्ला देतात.
Image credits: Pinterest
Marathi

दर 2 दिवसांनी कव्हर बदला

घाणेरडं कव्हर चेहऱ्यावरचं तेल आणि घाम शोषून बॅक्टेरिया वाढवतं. यामुळे मुरुमं, ॲलर्जी आणि केसगळती होऊ शकते. म्हणून दर १-२ दिवसांनी कव्हर बदला.
Image credits: social media
Marathi

उशीला उन्हात ठेवा

उशीसाठी प्रोटेक्टर वापरल्यास बॅक्टेरिया आत जात नाहीत. तसेच, महिन्यातून एकदा उशीला उन्हात ठेवल्याने बुरशी आणि जंतूंचा नाश होतो.
Image credits: social media
Marathi

उशीच्या कव्हरची स्वच्छता आवश्यक

ऋतू बदलल्यावर कव्हर धुवा आणि उशी झटकून ठेवा. यामुळे तिचं आयुष्य वाढतं. लक्षात ठेवा, मेमरी फोमची उशी थेट पाण्याने धुवू नये.
Image credits: Freepik

Home Decor: पानांच्या वॉलपेपरने भिंतींना द्या ग्रीन पॅराडाइज लुक...

Jewellery: एथनिक लुकला चार चाँद लावतील हे झुमके, ट्राय करा ही डिझाइन्स

Kids Silver Anklets: मुला-मुली दोघांनाही शोभून दिसतील चांदीच्या पैंजणच्या 7 युनिसेक्स डिझाइन्स

Silver Bangle: फ्युचर सिक्युरिटीसोबत स्टाईलही! पाहा चांदीच्या बांगड्यांचे 7 लेटेस्ट डिझाइन्स