Marathi

मन शांत ठेवण्यासाठी सकाळी कोणते व्यायाम करावेत?

Marathi

श्वसनाने सुरुवात करा

सकाळी उठल्यावर सर्वप्रथम गाढ श्वास घेण्याचा व्यायाम करा. १० वेळा खोल श्वास घ्या आणि सोडा. तणाव कमी होतो, मन एकाग्र राहतं.

Image credits: Freepik
Marathi

प्राणायाम – वायू नियंत्रणाचं साधन आहे

अनुलोम-विलोम आणि भ्रामरी प्राणायाम यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो. मानसिक संतुलन राखण्यासाठी हा सर्वात प्रभावी उपाय आहे.

Image credits: social media
Marathi

सूक्ष्म व्यायाम – शरीर जागं करा

संधी, मान, खांदे, कंबर आणि गुडघे यांसाठी हळुवार हलचाली करा. मन आणि शरीर दोन्ही तयार होतात.

Image credits: Getty
Marathi

ध्यान (Meditation)

५ ते १० मिनिटे शांत बसून डोळे बंद करा. फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे मानसिक गोंधळ थांबतो आणि शांती अनुभवता येते.

Image credits: pexels
Marathi

चालणे किंवा सॉफ्ट वॉकिंग

बाहेर स्वच्छ हवेत १०-१५ मिनिटे चालल्याने मन प्रसन्न होतं. निसर्गात चालणे ही नैसर्गिक ध्यानसाधना आहे.

Image credits: pexels
Marathi

सूर्यनमस्कार – शरीर-मन दोन्ही संतुलित राहतं

पवित्र असलेला सूर्यनमस्कार हा परिपूर्ण व्यायाम आहे. यामुळे मन, शरीर आणि श्वास – तिन्हीचा ताळमेळ साधतो.

Image credits: Freepik
Marathi

दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा

व्यायामानंतर २ मिनिटे स्वतःला असा प्रश्न विचारा: "आज मी शांत राहून काय साध्य करू शकतो?" सकाळच्या सकारात्मक सुरुवातीने दिवसभर मन स्थिर राहतं.

Image credits: Pexels

Vinayak Chaturthi : आज शनिवारी विनायक चतुर्थी निमित्त करा हे 5 उपाय, घरात सुख समृद्धी नांदेल

Good Night चे मित्रपरिवाराला पाठवण्यासाठी खास मेसेज

Good Morning Message: सकाळ होईल प्रसन्न, मित्र मैत्रिणींना पाठवा मेसेज

Good Evening चे मित्रपरिवाराला खास मेसेज पाठवून संध्याकाळ घालवा आनंदात