Marathi

इथे लोक १०० वर्षांहून अधिक जगतात, कारण हे आहे लाइफ सीक्रेट

Marathi

ही आहेत ती ५ ठिकाणं

ग्रीसमधील इकेरिया, इटलीमधील सार्डिनिया, जपानमधील ओकिनावा, कोस्टा रिकामधील निकोया पेनिन्सुला आणि अमेरिकेतील लोमा लिंडा. या पाच ठिकाणांना 'ब्लू झोन्स' म्हटलं जातं.

Image credits: Pixabay
Marathi

शाकाहारावर सर्वाधिक भर

या ब्लू झोनमधील लोक प्रामुख्याने फळे, भाज्या, डाळी, तृणधान्ये आणि सुकामेवा यांसारख्या शाकाहारी पदार्थांचाच आपल्या आहारात समावेश करतात.

Image credits: Pixabay
Marathi

मांसाहाराचे प्रमाण अत्यंत कमी

हे लोक आपल्या जेवणात मांसाचा वापर अत्यंत कमी करतात. मात्र, काही विशिष्ट भागांमधील लोक नियमितपणे मासे खाण्याला पसंती देतात.

Image credits: Pixabay
Marathi

८० टक्क्यांचा खास नियम

जपानमधील ओकिनावाचे लोक कधीच पोटभर जेवत नाहीत. पोट ८० टक्के भरलं की ते जेवण थांबवतात. या सवयीमुळे त्यांच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण नियंत्रणात राहते.

Image credits: Pixabay
Marathi

दररोजचा शारीरिक व्यायाम

हे लोक जिममध्ये जात नाहीत. शेती करणे, चालणे आणि घरातील कामे करणे यांसारख्या दैनंदिन गोष्टींमधूनच ते आपला नियमित व्यायाम पूर्ण करतात.

Image credits: Pixabay
Marathi

पुरेशी झोप आणि विश्रांती

हे लोक दररोज शरीराला आवश्यक असलेली पुरेशी झोप घेतात. काही भागांमधील लोक दुपारच्या वेळी थोडा वेळ वामकुक्षी घेण्याची सवयही आवर्जून पाळतात.

Image credits: Pixabay

Horseshoe Vastu Tips : घराच्या मुख्य दरवाजावर घोड्याची नाल का आणि कशी लावावी?

Haram Designs : सिल्क साड्यांवर खुलून दिसतील हे सुंदर लाँग हार

Travel Guide : ॲडव्हेंचरसाठी लडाख, तर शांततेसाठी तवांगला भेट द्या

Better Sleep : शांत झोप हवीये? झोपण्यापूर्वी करा हे एक छोटंसं काम