लिव्हर सिरोसिसची लक्षणे कोणती आहेत ते पाहूया.
त्वचेवर आणि डोळ्यांमध्ये पिवळसरपणा कधीकधी लिव्हर सिरोसिसचे लक्षण असू शकते.
लहान जखमांमधूनही सहज रक्तस्त्राव होणे हे देखील दुर्लक्ष करू नये.
पोटाच्या वरच्या उजव्या भागात, जिथे यकृत असते तिथे अस्वस्थता, वेदना, सूज ही सिरोसिसची लक्षणे असू शकतात.
त्वचेवर पुरळ येणे, तीव्र खाज सुटणे ही देखील सिरोसिसची लक्षणे असू शकतात.
पायांमध्ये, घोट्यांमध्ये आणि तळव्यांमध्ये सूज येणे हे देखील लिव्हर सिरोसिसचे लक्षण आहे.
लिव्हर सिरोसिसचे लक्षण म्हणून गडद मूत्र आणि फिकट शौच दिसू शकते.
वजन कमी होणे, मळमळ आणि उलट्या होणे, भूक न लागणे, अतीव थकवा ही देखील सिरोसिसची लक्षणे असू शकतात.
वरील लक्षणे दिसल्यास स्वतःहून निदान करण्याचा प्रयत्न न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानंतरच आजाराची पुष्टी करा.
फक्त 1% लोक या 7 प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊ शकले, तुम्ही देऊ शकता का?
Long Distance Relationship साठी आवश्यक ७ टिप्स, नात्यात येईल गोडवा
लहंगा असो की चोळी, कमी बजेटमध्ये हे लटकन देतील स्टायलिश & रिच लुक
Embroidery Neck चे लेटेस्ट 7 Ideas, पार्टी वियर सूटची वाढेल शोभा