Marathi

उन्हाळ्यात त्वचेवर दीर्घकाळ टिकेल मेकअप; फक्त या टिप्स करा फॉलो

Marathi

त्वचा स्वच्छ ठेवणं सर्वात महत्त्वाचं

मेकअप करण्याआधी चेहरा चांगल्या फेसवॉशने स्वच्छ धुणं गरजेचं आहे. त्वचेवर धूळ, ऑईल किंवा घाम असेल तर मेकअप व्यवस्थित बसत नाही. क्लिन्सिंगनंतर बर्फाने हलका मसाज करा. 

Image credits: Asianet News
Marathi

ऑईल-फ्री मॉइश्चरायझर वापरा

अनेक जण उन्हाळ्यात मॉइश्चरायझर टाळतात, पण ते चुकीचं आहे. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी हलकं आणि ऑईल-फ्री मॉइश्चरायझर वापरणं गरजेचं असतं. तसेच स्किन टाइपनुसार हलकं मॉइश्चरायझर निवडा.

Image credits: Asianet News
Marathi

प्रायमरमुळे मेकअप टिकतो जास्त वेळ

प्रायमर हा उन्हाळ्यातील मेकअपचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. प्रायमरमुळे त्वचेवरील पोअर्स ब्लर होतात आणि मेकअपचा बेस अधिक स्मूथ दिसतो. घाम व ऑईलमुळे मेकअप पटकन खराब होत नाही. 

Image credits: Asianet News
Marathi

हलका आणि मॅट बेस निवडा

उन्हाळ्यात हेवी फाउंडेशन वापरल्यास चेहरा केकी दिसू शकतो. त्यामुळे बीबी क्रीम, सीसी क्रीम किंवा हलकं मॅट फाउंडेशन वापरणं अधिक योग्य ठरतं. हे प्रॉडक्ट्स त्वचेला नैसर्गिक लूक देतात. 

Image credits: Asianet News
Marathi

वॉटरप्रूफ मेकअप प्रॉडक्ट्स निवडा

उन्हाळ्यात काजळ, आयलाइनर किंवा मस्कारा पसरण्याची शक्यता जास्त असते. वॉटरप्रूफ व स्मज-प्रूफ प्रॉडक्ट्स वापरणं उत्तम पर्याय ठरतो.यामुळे घाम आल्यानंतरही डोळ्यांचा मेकअप टिकतो.

Image credits: Asianet News
Marathi

कॉम्पॅक्ट आणि ब्लॉटिंग पेपर ठेवा सोबत

उन्हाळ्यात चेहरा ऑयली दिसू लागल्यास वारंवार फेस पुसण्याऐवजी ब्लॉटिंग पेपर वापरा. यामुळे अतिरिक्त ऑईल कमी होतं आणि मेकअप खराब होत नाही. 

Image credits: Asianet News
Marathi

सेटिंग स्प्रेचा वापर करा

मेकअप पूर्ण झाल्यानंतर सेटिंग स्प्रे वापरणं विसरू नका. सेटिंग स्प्रे मेकअप लॉक करण्याचं काम करतो. त्यामुळे उष्णता आणि घामामुळे मेकअप लवकर खराब होत नाही. 

Image credits: INSTAGRAM
Marathi

कमी मेकअप, जास्त ग्लो

उन्हाळ्यात जास्त लेअर्स असलेला मेकअप टाळणं चांगलं. हलका आणि नैसर्गिक मेकअप चेहऱ्याला फ्रेश आणि ग्लोईंग लूक देतो. न्यूड शेड्स, हलका ब्लश मेकअप उन्हाळ्यासाठी परफेक्ट मानला जातो. 

Image credits: Asianet News

Fashion Tips: Gen Z मुलींसाठी ट्राय करा सरगुन मेहताचे हे 6 सलवार सूट

Kitchen Decor: फ्रीजसाठी निवडा अशी सुंदर कव्हर्स, फ्रीजला द्या नवा लूक

Bakri Eid Gift Ideas: बकरी ईदला अम्मीला गिफ्ट करा गीता कपूरसारखे सूट

Fashion Trends: Gen Z चे 5 फॅशन ट्रेंड्स; डेली स्टाईल गाईडवर एक नजर