नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला देवीला दाखवा हा भोग, इच्छा होतील पूर्ण
Lifestyle Sep 20 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest
Marathi
नवरात्रीचा कालावधी कधीपासून कधीपर्यंत आहे
शारदीय नवरात्री 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे, जी 1 ऑक्टोबर रोजी समाप्त होईल. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवी दुर्गेच्या स्वरूपानुसार भोग अर्पण करण्याची परंपरा आहे.
Image credits: pinterest
Marathi
पहिला दिवस - माता शैलपुत्री
या दिवशी देवी दुर्गेचे प्रथम स्वरूप माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. या दिवशी गाईचे तूप अर्पण केल्याने भक्तांवर देवी दुर्गेची विशेष कृपा होते, यामुळे रोग आणि कष्ट दूर होतात.
Image credits: pinterest
Marathi
दुसरा दिवस - माता ब्रह्मचारिणी
या दिवशी देवी दुर्गेला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे, यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी येते.
Image credits: pinterest
Marathi
तिसरा दिवस - माता चंद्रघंटा
या दिवशी देवी दुर्गेची पूजा माता चंद्रघंटा रूपात केली जाते. या दिवशी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवल्याने मानसिक शांती आणि दुःखांपासून मुक्ती मिळते.
Image credits: pinterest
Marathi
चौथा दिवस - माता कुष्मांडा
या दिवशी देवी दुर्गेला मालपुआचा प्रसाद अर्पण केल्याने जीवनातील सर्व दुःखांचा नाश होतो.
Image credits: pinterest
Marathi
पाचवा दिवस - माता स्कंदमाता
शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीला केळ्याचा नैवेद्य दाखवावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
Image credits: pinterest
Marathi
सहावा दिवस - माता कात्यायनी
या दिवशी माता कात्यायनीला मधाचा प्रसाद अर्पण करावा. यामुळे आकर्षण शक्ती वाढते आणि नातेसंबंध मधुर होतात.
Image credits: pinterest
Marathi
सातवा दिवस - माता कालरात्री
या दिवशी माता कालरात्रीला गूळ किंवा गुळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात.
Image credits: pinterest
Marathi
आठवा दिवस - माता महागौरी
आठव्या दिवशी देवी दुर्गेच्या महागौरी स्वरूपाची पूजा केली जाते, या दिवशी देवीला नारळाचा प्रसाद अर्पण करावा. यामुळे संतान संबंधित समस्या दूर होतात.
Image credits: pinterest
Marathi
नववा दिवस - माता सिद्धिदात्री
नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीला तिळाचा प्रसाद अर्पण करावा. यामुळे आकस्मिक संकटांपासून संरक्षण मिळते.