Marathi

ब्रेसलेट मंगळसूत्र: हातात घाला सौभाग्याचं लेणं, पाहा 6 खास डिझाइन्स

आजकाल गळ्यातल्या मंगळसूत्रासोबतच हातात घालता येणाऱ्या ब्रेसलेट मंगळसूत्राचा ट्रेंड आहे. हे दिसायला स्टायलिश आणि मॉडर्न लूक देतं.
Marathi

गोल्ड ब्रेसलेट मंगळसूत्र डिझाइन्स

सोन्याची चेन, काळे मणी आणि सुंदर पेंडंट वापरून तयार केलेले ब्रेसलेट मंगळसूत्र म्हणजे मॉडर्न आणि पारंपरिक लूकचा उत्तम मिलाफ. चला पाहूया ६ लेटेस्ट गोल्ड ब्रेसलेट मंगळसूत्र डिझाइन्स.

Image credits: Pinterest
Marathi

फ्लोरल मोटिफ डबल लेअर गोल्ड ब्रेसलेट

डायमंड फ्लोरल डिझाइन नेहमीच एव्हरग्रीन असतं. या ब्रेसलेटमध्ये काळ्या मण्यांसोबत सोन्याचं फुलाचं पेंडंट आणि छोटे डायमंड किंवा स्टोन वापरले जातात. हे दिसायला खूपच आकर्षक वाटतं.

Image credits: Pinterest
Marathi

इन्फिनिटी स्टाईल गोल्ड ब्रेसलेट

हे इन्फिनिटी स्टाईल गोल्ड ब्रेसलेट डिझाइन ॲनिव्हर्सरी, पार्टी आणि सणांसाठी एक उत्तम पर्याय आहे. याचं सिंपल फिनिशिंग हेच याचं वैशिष्ट्य आहे. असं डिझाइन एकदा नक्की ट्राय करा.

Image credits: Pinterest
Marathi

डायमंड हार्ट-शेप ब्रेसलेट मंगळसूत्र

हार्ट-शेप डायमंड पेंडंट असलेलं गोल्ड ब्रेसलेट मंगळसूत्र सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. यात छोटे डायमंड, काळे मणी आणि सोन्याची चेन यामुळे खूप क्लासी आणि प्रीमियम लूक येतो.

Image credits: Pinterest
Marathi

मंगळसूत्र ब्रेसलेट कडा डिझाइन

ऑफिस आणि कॅज्युअल आऊटफिट्ससोबत हे मंगळसूत्र ब्रेसलेट कडा डिझाइन सहज मॅच होतं. तुम्ही हे पार्टीवेअरमध्ये साडी, सूट आणि लेहंग्यासोबतही घालू शकता.

Image credits: limelightdiamonds instagram
Marathi

मिनिमल ब्लॅक बीड्स ब्रेसलेट मंगळसूत्र

सिंपल आणि एलिगंट ज्वेलरी आवडत असेल, तर पातळ सोन्याच्या चेनवर काळे मणी असलेलं हे मिनिमल डिझाइन निवडा. यात एक छोटंसं सोन्याचं मोटिफ, डायमंड पेंडंट, जे रोजच्या वापरासाठी परफेक्ट

Image credits: Pinterest
Marathi

इन्फिनिटी नेम लेटर डिझाइन ब्रेसलेट

इन्फिनिटी पॅटर्न हे नेहमीच अतूट नात्याचं प्रतीक मानलं जातं. सोन्याचं नावाचं अक्षर, काळ्या मण्यांनी बनलेलं हे ब्रेसलेट मंगळसूत्र खूप हलकं, ट्रेंडी दिसतं.खास प्रसंगी स्टाईल करू शकता.

Image credits: Whitehathi

Pearl Jewellery: सोनं-चांदी विसरा, रॉयल लूकसाठी ट्राय करा पर्ल ज्वेलरी; पाहा अभिनेत्रींचे खास स्टाइल्स

Tummy Hiding Blouse : पोट दिसणार नाही, टिचर्सचे ६ फुल कव्हरेज ब्लाउज

Blouse Design : नजर खिळेल, ब्लाउजच्या 10 बॅक डिझाइन्स, स्टायलिश लूक

Green Blouse Designs : श्रावणात हिरव्या साडीवर वापरा 7 मॉडर्न ब्लाउज