सकाळच्या थंडीत शरीर करा गरम, हे व्यायाम केल्यावर गारठं जाईल पळून
आपल्या शरीराला गरम ठेवण्यासाठी सोपे, घरी करता येणारे व्यायाम घरी करून पाहता येतात. आपण सहजपणे घरच्या घरी कोणते व्यायाम करता येतील ते जाणून घेऊयात.
Lifestyle Nov 28 2025
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
जागेवर धावा
जागेवर धावण्याने रक्ताभिसरण वाढते असते. त्यामुळे पाय वर घेऊन त्यावर हात मारून आपण व्यायामाला सुरुवात करू शकता. आपण थोडा वेळ रनिंग केल्यावर आपलं शरीर गरम करतं.
Image credits: Getty
Marathi
जम्पिंग जॅक्स (Jumping Jacks)
आपण संपूर्ण शरीर हलवल्यावर हृदयाचे ठोके वाढायला सुरुवात होते. आपण १०० जम्पिंग जॅक मारल्यावर शरीर गरम होत आणि व्यायाम चांगला होतो.
Image credits: Getty
Marathi
स्क्वॅट्स (Squats)
पाय आणि कोअर गरम करण्यासाठी आपण स्क्वाट करू शकता. त्यामुळं आपल्या संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम व्हायला मदत होते. त्यामुळं आपण डंबेल घेऊन स्क्वाट केल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो.
Image credits: Getty
Marathi
पुशअप्स (Push-Ups)
वरच्या अंगामध्ये ताकद येण्यासाठी आपण पुशअप्सचा व्यायाम करू शकता. आपण नियमितपणे पुशअप्स केल्यावर व्यायाम चांगला मजबूत होतो. त्यामुळं शरीराची उष्णता चांगली तयार होते.
Image credits: FreePik/ Pexels
Marathi
योगासने (Surya Namaskar)
थंडीत सूर्यनमस्कार केल्यावर शरीर उष्णता देतं. आपण ५ ते ८ राऊंडचे सूर्यनमस्कार केल्यावर शरीर हलके, गरम आणि उर्जावान येत असते.