कोल्हापुरी मिसळ ही महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि झणझणीत डिश आहे. चव, मसाला आणि रस्स्याचं अचूक मिश्रण म्हणजे मिसळ. चला, ही मिसळ घरच्या घरी बनवायला शिकून घेऊयात.
Image credits: fb
Marathi
साहित्य
१ कप मटकी, १ मध्यम कांदा, १ टमाटं, १ चमचा आले-लसूण पेस्ट, हळद, मिरची पावडर, गरम मसाला, मीठ, तेल, १ मोठा कांदा, १/२ कप ओले खोबरे, १ चमचा कोल्हापुरी मसाला, १ चमचा लाल तिखट
Image credits: fb
Marathi
उसळ कशी बनवायची?
मटकी अंकुरवून शिजवून घ्या. कढईत तेल गरम करून कांदा परतवा. आले-लसूण पेस्ट, हळद, मिरची पावडर टाका. नंतर टमाटं घालून परतून घ्या. शिजवलेली मटकी घालून ५-७ मिनिटं उकळा.
Image credits: social media
Marathi
कट (रस्सा) कसा तयार करायचा?
कांदा आणि खोबरे खरपूस भाजून वाटून घ्या. पातेल्यात हे वाटण, तिखट, कोल्हापुरी मसाला टाका. पाणी घालून चांगलं उकळा. चवीनुसार मीठ घालून गरम ठेवून द्या.
Image credits: social media
Marathi
मिसळ सर्व्ह कशी करायची?
एका वाटीत उसळ घ्या. वरून गरम कट ओता. बारीक शेव, कांदा, कोथिंबीर आणि लिंबू घाला. बरोबर पाव किंवा ब्रेड सर्व्ह करा.
Image credits: social media
Marathi
मिसळची खास चव कशामुळे येते?
कोल्हापुरी मसाल्यामुळे मिसळला चव येते. खरपूस वाटणामुळे आणि झणझणीत रस्सा आणि ताज्या टॉपिंग्समुळे मिसळला चव येत असते.
Image credits: social media
Marathi
स्वाद वाढवण्यासाठी
मिसळीमध्ये पातळ आणि घट्ट रस्सा वेगळा ठेवा. कोथिंबीर, शेव आणि कांदा शेवटीच घालावं. कोल्हापुरी चवसाठी घरगुती मसाला वापरा.