कंपोस्ट खत हे सेंद्रिय (ऑरगॅनिक) खत असून, ते घरच्या कचऱ्यापासून तयार करता येते. हे खत झाडांसाठी पोषणद्रव्यांचा उत्तम स्रोत असून मातीची सुपीकता वाढवते.
Image credits: pinterest
Marathi
कंपोस्ट खत म्हणजे काय?
कंपोस्टिंग म्हणजे सेंद्रिय कचऱ्याचे विघटन होऊन नैसर्गिक खत तयार होणे. यात असलेले नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम (NPK) झाडांसाठी उपयुक्त असतात.
Image credits: Social Media
Marathi
साहित्य
सेंद्रिय कचरा – भाज्यांचे टरफले, फळांच्या साली, चहा चोथा, अन्नाचा उरलेला भाग, कार्बनयुक्त पदार्थ – सुकलेली पाने, गवत, लाकडाचा भुगा, पेपर, माती – कंपोस्टिंग प्रक्रियेस मदत करणारी
Image credits: Social Media
Marathi
स्टेप-बाय-स्टेप कृती
ड्रम किंवा मोठ्या कुंडीत तळाशी एक थर माती टाका. त्यावर किचनमधील टरफले, फळांच्या साली, चहा-चोथा टाका. आता त्यावर गवत, कागदाचे तुकडे किंवा सुकलेली पाने टाका.
Image credits: pinterest
Marathi
कंपोस्ट खत तयार करा
हलक्या हाताने ढवळून घ्या आणि थोडे पाणी शिंपडा. हे मिश्रण १५ दिवसांनी हलवून द्या. सुमारे ४-६ आठवड्यांत कंपोस्ट खत तयार होते.
Image credits: pinterest
Marathi
कंपोस्ट खताचे फायदे
माती सुपीक होते: आवश्यक पोषकतत्व मिळतात.
पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते: झाडे दीर्घकाळ टवटवीत राहतात.
रासायनिक खतांची गरज कमी होते: नैसर्गिक खत अधिक चांगले परिणाम देते.