हिंदू धर्मामध्ये होळीचा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो. हा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
Image credits: adobe stock
Marathi
होलिका दहन
रंगपंचमीच्या एक दिवस आधी होलिका दहनाचा सण साजरा केला जातो. यंदा होळी 13 मार्चला साजरी केली जाणार आहे. पण या दिवशी भौमप्रदोष आहे.
Image credits: adobe stock
Marathi
भौमप्रदोष किती वाजेपर्यंत असणार?
13 मार्चला होलिका दहनाच्या सकाळी 10.30 वाजल्यापासून ते रात्री 11.27 पर्यंत भौमप्रदोष असणार आहे.
Image credits: Getty
Marathi
होलिका दहनाचा शुभ मुहूर्त
भौमप्रदोष संपल्यानंतर रात्री 11.26 वाजल्यापासून ते 12.30 पर्यंत होलिका दहनाचा मुहूर्त असणार आहे.
Image credits: Getty
Marathi
होलिका दहनाचे महत्व
प्रत्येक वर्षी विधीविधानाने होलिका दहनाची पूजा केली जाते. होलिका दहनाच्या अग्नीमध्ये व्यक्तीच्या वाईट गोष्टींचा नाश होऊन चांगल्या गोष्टी घडाव्यात यासाठी प्रार्थना केली जाते.
Image credits: adobe stock
Marathi
होळीत अर्पण करा या गोष्टी
होळीमध्ये नारळ, साखरेच्या माळ्या, अक्षता, गुलाल, हळद, बताशे अशा गोष्टी अर्पण करू शकता.
Image credits: adobe stock
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.