ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरुषांनी त्यांच्या रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. चला पाहूया कोणते आहेत हे पदार्थ.
बीटामध्ये डायटरी नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे रोजच्या आहारात बीटाचा समावेश नक्की करा.
ब्रोकोलीमध्ये नायट्रेट्सचं प्रमाण जास्त असतं. यामुळे रक्तवाहिन्यांना आधार मिळतो आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
ओट्समध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. हे हृदयाचं आरोग्य जपण्यास आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं.
सॅल्मनसारख्या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं. हे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवतं आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतं.
पालेभाज्यांमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आढळतात. हे घटक ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतात आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
केळ्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण खूप जास्त असतं. यामुळे शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यासही मदत होते.
वॉशिंग मशीनमध्ये 'हे' कपडे चुकूनही धुवू नका, नाहीतर पश्चाताप होईल!
रक्षाबंधनासाठी बहिणीला खुश करतील 1 ग्रॅम गोल्डच्या 7 ट्रेंडी इअररिंग्स
साडी-सलवार सूटवर ट्राय करा या डिझाइन्सचे पेटेंड, खुलेल लूक
Black Pepper : काळी मिरी खाण्याचे १० जबरदस्त फायदे, आहारात नक्की समावेश करा