15 दिवसात वजन होईल कमी, पुरुषांनी फॉलो करा हा डाएट प्लॅन
Lifestyle Jan 31 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
वजन वाढण्यामागील कारणे
सध्याच्या धापवळीच्या आयुष्यात लठ्ठपणा, वजन वाढणे अशा समस्या उद्भवल्याचे दिसून येते. तर पुरुष मंडळींनी वजन कमी करण्यासाठी कोणता डाएट प्लॅन फॉलो करावा हे जाणून घेऊया.
Image credits: social media
Marathi
सकाळी उठल्यानंतर डिटॉक्स ड्रिंक
सकाळच्या वेळेस डिटॉक्स ड्रिंक पिणे फार महत्वाचे आहे. यासाठी काकडीचे पाणी, मेथीचे पाणी अथवा जीरा पाणी पिऊ शकता. यामुळे मेटाबॉलिज्मचा वेग वाढला जात शरिरातून टॉक्सिन्स बाहेर पडतात.
Image credits: freepik
Marathi
नाश्ता करणे टाळू नका
काहीजण वजन कमी करण्याच्या नादात नाश्ता करणे टाळतात. पण यामुळे वजन कमी होते असे नाही. उलट वाढले जाऊ शकते. नाश्तामध्ये ओट्स, बेसनाचा पोळा असे पदार्थ खाऊ शकता.
Image credits: Freepik
Marathi
मिड मॉर्निंगसाठी काय?
मिड मॉर्निंगवेळी मिक्स नट्स, पनीर किंवा एखादे हेल्दी स्नॅक्सचे सेवन करावे. जेणेकरुन लंचवेळी अधिक खाण्याची गरज नाही.
Image credits: social media
Marathi
लंचमध्ये काय?
दुपारच्या जेवणामध्ये डाळ, हिरव्या भाज्या, सॅलड किंवा पोळीचा समावेश असावा. यावेळी पोषणयुक्त आहाराचे सेवन करा.
Image credits: social media
Marathi
संध्याकाळच्या वेळेस हेल्दी स्नॅक्स
संध्याकाळच्या वेळेस चहा-कॉफीएवजी हेल्दी स्नॅक्सचे सेवन करा. नट्स, ड्राय फ्रुट्स किंवा एखादे फळं खाऊ शकता. जेणेकरुन मेटाबॉलिज्म व्यवस्थितीत राहण्यास मदत होईल.
Image credits: freepik
Marathi
रात्रीचे जेवण
रात्रीचे जेवण नेहमीच हलके आणि झोपण्याच्या 2-3 आधी करावे. यामध्ये डाळ, भाज्या, सॅडल किंवा सूप पिऊ शकता. रात्री उशिरा जेवण करणे टाळा.
Image credits: facebook
Marathi
खूप पाणी प्या
दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्या. यामुळे मेटाबॉलिज्म वेगाने वाढला जातो आणि वजन लवकर कमी होण्यास मदत होते. याशिवाय हलका व्यायामही दिवसातून एकदा थोडावेळ करा.
Image credits: Social Media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.