अर्थमंत्री निर्मला सीतारमण वर्ष 2025 चा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पोहोचल्या आहेत. यावेळी निर्मला सीतारमण यांनी गोल्डन जरी बॉर्डर असणारी ऑफ व्हाइट रंगातील साडी नेसली आहे.
निर्मला सीतारमण यांचा यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्याचा लूक थोडा वेगळा आहे. अर्थमंत्र्यांनी लाल रंगातील बॉर्डर असणारे ब्लाऊज आणि क्रिम रंगातील शॉलसोबत आपला लूक पूर्ण केला आहे.
निर्मला सीतारमण यांच्या साडीवर मधुबनी पेटिंग्स काढण्यात आले आहे. या संपूर्ण साडीवर गोल्डन धाग्याने काम करण्यात आले आहे.
निर्मला सीतारमण यांना मधुबनी पेटिंग्समधील साडी पद्मश्री पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांनी गिफ्ट केली होती. अर्थसंकल्पावेळी ही नेसण्याची विनंती दुलारी देवींनी विनंती केली होती.
दुलारी देवी मिथिला आर्टसाठी प्रसिद्ध आहे. यांना वर्ष 2021 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.