Marathi

सुरकुत्या लपवा, चेहरा उजळवा; 50+ महिलांसाठी सोपा मेकअप लूक

वाढत्या वयात त्वचेवर सुरकुत्या आणि फाईन लाईन्स दिसू लागतात. पण योग्य मेकअप तंत्राने तुम्ही तरुण आणि फ्रेश दिसू शकता. जाणून घ्या काही सोप्या टिप्स.
Marathi

पन्नाशीनंतर मेकअप कसा करायचा?

वयाची पन्नाशी ओलांडली की त्वचा सैल पडते आणि सुरकुत्या दिसू लागतात. पण काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही वयापेक्षा लहान दिसू शकता आणि सुंदर लूक मिळवू शकता.

Image credits: instagram
Marathi

चेहऱ्यानुसार मेकअपचं टेक्चर निवडा

तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या जास्त असतील, तर मॅट फिनिश मेकअप निवडा. शिमर मेकअपने फाईन लाईन्स कमी दिसतात. किंवा हलकी चमक आणि स्मूद लूक देणारा सॅटिन मेकअप तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.

Image credits: instagram
Marathi

स्किन केअरमध्ये सीरमचा समावेश करा

  • Hyaluronic Acid - त्वचेला प्लफी (फुगीर) दाखवतं.
  • Ceramides Serums - त्वचेला मजबूत बनवतं.
  • Peptized Serum - कोलेजन वाढवण्यासाठी मदत करतं.
  • Vitamin C - त्वचेला ग्लो देतं.
Image credits: instagram
Marathi

फाउंडेशनची शेड कशी निवडायची?

स्किन केअरनंतर त्वचेवरील पोअर्स बंद करणारा प्रायमर लावा. फाउंडेशनसाठी स्किन टिंट किंवा लाइटवेट हायड्रेटिंग शेड निवडा. हेवी फाउंडेशनने सुरकुत्या अधिक दिसतात आणि चेहरा सपाट वाटतो.

Image credits: instagram
Marathi

कॉम्पॅक्ट पावडरचा वापर कमीत कमी करा

पन्नाशीनंतर कॉम्पॅक्ट पावडरचा वापर कमी करा. ही पावडर सैल त्वचेवर आणि सुरकुत्यांमध्ये जमा होते, जे दिसायला खराब वाटतं. त्याऐवजी फक्त T-Zone वर पावडर लावून सेटिंग स्प्रे वापरा.

Image credits: instagram
Marathi

डोळ्यांसाठी सिंपल मेकअप निवडा

  • मॅट आयशॅडोचा वापर करा.
  • डोळ्यांच्या क्रीजवर आयशॅडो लावा.
  • काळ्याऐवजी ग्रे आयलायनर वापरा.
  • ट्यूबिंग मस्काराचा वापर करा.
  • आयब्रोचा कलर अगदी हलका ठेवा.
  •  न्यूड किंवा लाईट पिंक शेड निवडा.
Image credits: instagram
Marathi

ब्लश, ब्रॉन्झर आणि हायलाइटर

  • ब्लश - गालांच्या वरच्या बाजूला लावून वरच्या दिशेने ब्लेंड करा.
  • ब्रॉन्झर - कपाळाच्या वरच्या भागात लावा.
  • हायलाइटर - गालांवर, डोळ्यांच्या कोपऱ्यात आणि ओठांच्या वर लावा.
Image credits: instagram
Marathi

लिपस्टिकआधी लिप लायनर वापरा

वाढत्या वयानुसार ओठदेखील पातळ होतात. त्यामुळे लिप लायनरचा वापर नक्की करा. मॅटऐवजी क्रीमी टेक्सचर असलेली सॉफ्ट आणि हायड्रेटिंग लिपस्टिक निवडा. यामुळे ओठांना फिलर लूक मिळेल.

Image credits: Social Media

Gold Earrings: कानांना द्या कोल्हापुरी साज, गोल्ड इअररिंग्सच्या 7 लेटेस्ट डिझाइन्स

Shirt Crop Top: फक्त अर्धा मीटर कापडात बनवा स्टायलिश टॉप, कॉलेजमध्ये दिसाल एकदम हटके!

Home Decor: ड्रॉइंग रूमला असा द्या राजा-महाराजांसारखा रॉयल लूक

तुम्ही नाश्त्यात ओट्स खाता का? मग हे फायदे नक्की जाणून घ्या