डेथस्टॉकर विंचूचे विष अतिशय शक्तिशाली असते. यामुळे भयंकर वेदना आणि अर्धांगवायू होऊ शकतो. जीवघेणी ऍलर्जी होते. त्यामुळे मृत्यूही ओढवू शकतो. हा आफ्रिका आणि अरबच्या वाळवंटात राहतो.
पिवळा जाड शेपटीचा विंचू अँड्रोक्टोनस ऑस्ट्रेलिस हा उत्तर आफ्रिका आणि आग्नेय आशियात राहतो. याचे विष अत्यंत घातक असते. वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर मृत्यू होऊ शकतो.
अरेबियन जाड शेपटीच्या विंचूच्या विषामध्ये कार्डिओटॉक्सिन, मायोटॉक्सिन आणि न्यूरोटॉक्सिन असतात. उपचार मिळाले नाहीत तर मृत्यू होऊ शकतो. हा लाकडाच्या ढिगाऱ्याखाली, दगडांखाली असतो.
ब्राझिलियन पिवळ्या विंचूचे विष स्नायू आणि मज्जासंस्थेवर हल्ला करते. वेळेवर उपचार केले नाहीत तर हृदय काम करणे बंद करते, ज्यामुळे माणसाचा मृत्यू होतो.
रफ थिकटेल विंचू दक्षिण आफ्रिकेत राहतो. यांच्या विषाचा वापर औषधे बनवण्यासाठी सर्वाधिक केला जातो. याच्या डंकामुळे हायपरएस्थेसिया, आकडी, वेदना आणि पेरेस्थेसिया होऊ शकते.
अॅरिझोना बार्क विंचू उत्तर अमेरिकेत आढळतात. या विंचूचे विष खूप वेदनादायक असू शकते. याच्या डंकामुळे उलट्या, झिणझिण्याट आणि सुन्नपणा येतो. श्वास घेण्यास त्रास होतो.
भारतीय लाल विंचू डंक मारल्यास तीव्र वेदना, घाम येणे, उलट्या, श्वास घेण्यास त्रास, असामान्य हृदयगती, सायनोसिस आणि इतर लक्षणे दिसतात. उपचार मिळाले नाहीत तर मृत्यू होऊ शकतो.
टँझानियन लाल नखाळ्याचा विंचू आक्रमक असतो. हा खूप लवकर डंक मारतो. याचे विष सौम्य असते. म्हणून यामुळे मृत्यू होत नाही.
व्हिएतनाम फॉरेस्ट विंचू आक्रमक असतो. याच्या डंकाच्या लक्षणांमध्ये लालसरपणा, सूज आणि तीव्र वेदना यांचा समावेश होतो. विष मनुष्यांसाठी घातक नाही. केवळ सौम्य अर्धांगवायू होऊ शकतो.