महाराष्ट्रातील Road Trip करण्यासाठी 8 बेस्ट ठिकाणे, लुटाल मजा
Lifestyle Jan 07 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
महाराष्ट्रातील रोड ट्रिपसाठी बेस्ट ठिकाणे
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रोड ट्रिप करता येऊ शकते. पण कमी खर्चात एखादी थंडीत रोड ट्रिप करायची असल्यास पुढील ठिकाणांना नक्की भेट देऊ शकता.
Image credits: Social media
Marathi
आगा खान पॅलेस
पुण्यात असलेला आगा खान पॅलेस सुलतान मोहम्मद शाह आगा खान तिसरा याने वर्ष 1892 मध्ये बांधला होता. हा राजवाडा त्याच्या उत्कृष्ट वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.
Image credits: social media
Marathi
अजिंठा लेणी
अजिंठा लेणी ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. येथे पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान औरंगाबाद शहरापासून 99 किमी अंतरावर आहे.
Image credits: Social media
Marathi
एलोरा लेणी
औरंगाबादपासून 15 किमी अंतरावर एलोरा लेणी आहे. येथे बौद्ध, जैन आणि हिंदू स्थळांचा समूह आहे. या लेण्यांमध्ये भारतीय स्थापत्यकलेचे तसेच शिल्पकलेचे चित्रण आहे.
Image credits: Social media
Marathi
कान्हेरी गुहा 2
मुंबईतील बोरिवली येथे कान्हेरी गुहा 2 ला भेट देऊ शकता. एखाद्या विकेंडल मित्रपरिवारासोबत संजय गांधी नॅशनल राष्ट्रीय उद्यानाच्या सुंदर निसर्गातून कान्हेरी गुहेपर्यंत पोहोचता येईल.
Image credits: Social media
Marathi
शनिवार वाडा
शनिवार वाडा हा पेशवा बाजीरावांनी बांधलेला भव्य वाडा आहे. वाडा बांधला तेव्हा; त्याने शहराचा जवळपास संपूर्ण परिसर व्यापला होता.
Image credits: Social media
Marathi
जयगड किल्ला
विजयाचा किल्ला म्हणूनही प्रसिद्ध असलेला जयगड किल्ला १६ व्या शतकात बांधला गेला . हा किल्ला रत्नागिरीत 13 एकर परिसरात पसरलेला आहे.