Marathi

या सिल्क साड्या नेसल्यावर कुणीही दिसेल एकदम खास

Marathi

कांजीवरम सिल्क

कांजीवरम साडी मूळची तामिळनाडूची. या साड्या जाड विणकाम आणि शुद्ध सोन्याच्या जरीकामासाठी ओळखल्या जातात. लग्नसमारंभात या साड्या आवर्जून नेसल्या जातात.
Image credits: Pinterest
Marathi

बनारसी सिल्क

वाराणसीमध्ये तयार होणाऱ्या या साड्या मुघल काळापासून प्रसिद्ध आहेत. मुलायम सिल्कवर सोनं आणि चांदीच्या धाग्यांनी विणलेली डिझाइन्स खूपच आकर्षक दिसतात.
Image credits: Pinterest
Marathi

पैठणी सिल्क

पैठणी ही महाराष्ट्राची पारंपरिक साडी आहे. तिच्या पदरावर रंगीबेरंगी मोराची डिझाइन असते. हातमागाच्या कलेचा हा एक उत्तम नमुना आहे.
Image credits: Pinterest
Marathi

म्हैसूर सिल्क

म्हैसूर सिल्क साडी कर्नाटकची ओळख आहे. या साड्या खूप प्रसिद्ध आहेत. त्या नेसायला अतिशय मऊ आणि हलक्या असतात.
Image credits: Pinterest
Marathi

पटोला सिल्क

गुजरातची ही प्रसिद्ध साडी 'इक्कत' नावाच्या डबल विणकाम पद्धतीने विणली जाते. या साडीच्या दोन्ही बाजूंना एकसारखी डिझाइन आणि रंग असतात.
Image credits: Pinterest
Marathi

मुगा सिल्क

आसाममधील दुर्मिळ रेशीम किड्यांपासून मिळणाऱ्या सिल्कने ही साडी विणली जाते. विशेष म्हणजे, ही साडी धुतल्यावर तिची चमक आणखी वाढते.
Image credits: Pinterest
Marathi

चंदेरी सिल्क

मध्य प्रदेशची ओळख असलेल्या चंदेरी सिल्कमध्ये कॉटनदेखील मिक्स असतं. त्यामुळे या साड्या खूपच मुलायम आणि हलक्या असतात.
Image credits: Pinterest

Gold Rings : अर्ध्या तोळ्यात सुंदर अंगठ्या, या लेटेस्ट डिझाइन्स पाहाच

Diamond Rings : डोळे दिपवणाऱ्या क्लासी डायमंड रिंग्स; एक तरी तुमच्याकडे हवीच

Bangle Designs : साडीवर दिसतील एकदम भारी! 'या' बांगड्यांचे डिझाइन्स नक्की ट्राय करा

Lightweight Gold Necklace: कमी वजनात सोन्याचे नेकलेस, पाहा एकापेक्षा एक सुंदर डिझाइन्स