डीप V-नेक किंवा U-नेक नाही, लहान मान लांब दिसण्यासाठी 5 पॅटर्न वापरा
Lifestyle Jan 25 2026
Author: Rameshwar Gavhane Image Credits:social media
Marathi
5 स्मार्ट आणि ग्रेसफुल नेकलाइन
ज्या महिलांची मान लहान असते, त्यांच्यासाठी 5 नेकलाइन पॅटर्न अधिक स्मार्ट आणि ग्रेसफुल ठरतात. मान लांब आणि सडपातळ दिसावी, यासाठी हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा.
Image credits: instagram
Marathi
शर्ट कॉलर नेकलाइन
हा पॅटर्न विशेषतः लहान मान आणि गोल चेहऱ्याच्या महिलांसाठी योग्य आहे. फ्रंट बटन लाइन व्हर्टिकल इफेक्ट देते, ज्यामुळे मान लांब दिसते.
Image credits: Pinterest
Marathi
असमेट्रिकल नेकलाइन डिझाइन
एका बाजूला झुकलेली असममेट्रिकल नेकलाइन (Asymmetrical Neckline) डोळ्यांचे लक्ष विचलित करते, ज्यामुळे मानेची लांबी अधिक संतुलित दिसते. हे हलक्या डिझायनर ब्लाउजसोबत ट्राय करा.
Image credits: Gemini AI
Marathi
मँडरीन कॉलर नेकलाइन
बऱ्याच लोकांना वाटते की कॉलरमुळे मान लहान दिसेल, पण सत्य याउलट आहे. पातळ आणि स्ट्रक्चर्ड मँडरीन कॉलर मानेला स्ट्रेच्ड लुक देते. हे एथनिक वेअरवर खूप छान दिसेल.
Image credits: instagram
Marathi
की-होल नेकलाइन आयडिया
की-होल नेकलाइनमधील लहान ओपनिंग डिझाइन खूप सुंदर दिसते. ही डीप नसली तरी मानेला ओपन लुक देते. हेवी ज्वेलरीशिवाय घाला, जेणेकरून नेक एरिया क्लीन दिसेल.
Image credits: social media
Marathi
व्हर्टिकल स्लिट नेकलाइन
हा पॅटर्न दिसायला मिनिमल असतो, पण त्याचा परिणाम अप्रतिम असतो. मध्यभागी असलेला हलका व्हर्टिकल कट डोळ्यांना वरून खाली आणतो, ज्यामुळे मान लांब दिसते.