साडी सुंदर दिसण्यासाठी ब्लाउज आकर्षक असणं खूप गरजेचं आहे. सोबर आणि रॉयल लुकसाठी हे पर्ल लेअरिंग ट्रँगल कट स्लीव्ह डिझाइन निवडा. त्यामुळे साडीचे सौंदर्य वाढेल.
आजकाल ब्लाउजमध्ये डोरी इंटरलॉक स्लीव्ह डिझाइन खूप लोकप्रिय आहे. हा ट्रेंड रेट्रो युगाची आठवण करून देतो आणि नेहमीच ट्रेंडमध्ये असतो.
ब्लाउजमध्ये सेमी किंवा फुल स्लीव्हज लुकमध्ये नवीन स्टाइल तयार करायची असेल, तर अशा बो कट स्टोन एम्बेडेड स्लीव्ह पॅटर्न निवडा. यामुळे तुम्हाला क्लासी लुक मिळेल.
ब्लाउजच्या डिझाईनमध्ये हाफ एम्ब्रॉयडरी, फॅन्सी लूक हवा असेल तर या प्रकारचे स्लीव्हज चांगले दिसतील. कोणत्याही पार्टी वेअर ब्लाउजसाठी तुम्ही कटआउट स्लीव्ह डिझाइनची निवड करू शकता.
ब्लाउजमध्ये पफ नेट स्लीव्हज वापरायला विसरू नका. पफ स्लीव्ह बेल्टेड डिझाइनचा हा प्रकार कोणत्याही साडी किंवा लेहेंग्यावर चांगला दिसेल.
बेबी फ्रिल स्टाइल ब्लाउजमध्ये लटकन जोडता येईल. फॅन्सी साडीच्या ब्लाउजवर तुम्ही अशा प्रकारचे पर्ल हुक स्लीव्हज बनवू शकता.
तुम्हाला कोणत्याही ब्लाउजला एथनिक लूक द्यायचा असेल, तर तुम्ही स्लीव्हजवर अशा प्रकारची डबल कलरची मोती लेस लावू शकता. बॅकलेस, डीपनेक किंवा स्क्वेअर नेक स्टाइलचे ब्लाउज वापरून पहा.