नवी दिल्ली रेल्वे स्थानकात प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेची वाट पाहत असलेल्या प्रवशांची मोठी गर्दी होत चेंगराचेंगरीची स्थिती उद्भवली गेली.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकात प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेन उशिराने धावत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली. रेल्वे आल्यानंतर त्यात चढण्यासाठी प्रत्येकाची चढाओढ सुरू होती.
रेल्वेत चढण्यासाठी तुफान गर्दी झाली होती. यामध्ये महिला आणि लहान मुलांना घेऊन एवढ्या गर्दीतून प्रवासी चढण्याचा प्रयत्न करत होते.
रेल्वे उशिराने आल्याने वाढलेल्या गर्दीने चढण्यासाठी धडपड सुरू केलीच. पण यावेळी मोठ्या प्रमाणात जन अक्रोश स्थानकात ऐकू येत होता.
चेंगराचेंगरी झाल्याच्या दुर्घटनेत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. याचेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या गर्दीतून उद्भवलेल्या स्थितीमुळे अनेकजण जखमीही झाले आहेत. याशिवाय स्थानकात अनेक प्रवाशांच्या चप्पल, बॅग्स किंवा अन्य सामान पडल्याचे दिसतेय.
सध्या रेल्वे स्थानकातील स्थिती नियंत्रणात आल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलेय.
सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मवर युजर्सकडून नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील दुर्घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. याशिवाय काहींनी फोटोही शेअर केले आहेत.
प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 26 फेब्रुवारीपर्यंत महाकुंभ मेळा असणार आहे. यासाठी जगभरातून आणि देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक जात आहेत.