ॲपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांना कोण ओळखत नाही, पण सध्या त्यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स चर्चेत आहेत. त्याचे कारण म्हणजे त्या महाकुंभासाठी प्रयागराज येथे आल्या आहेत.
लॉरेन पॉवेल महाकुंभात कल्पवासावर राहणार आहेत. याचा अर्थ कोट्यवधी रुपयांचा मालक महांकुभात साधेपणाने राहणार आहेत. यावरून त्यांची महाकुंभ व हिंदू धर्मावर किती श्रद्धा आहे हे कळू शकेल.
लॉरेन पॉवेल शनिवारी वाराणसीला पोहोचल्या. त्या दरम्यान त्यांनी गुलाबी रंगाचा सूट व डोक्यावर स्कार्फ घालून बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लॉरेन पॉवेल जॉब्स श्रीनिरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरी यांना आपले गुरु मानतात. कैलाशानंद महाराजांनी त्यांचे नाव पॉवेलवरून बदलून कमला केले.
लॉरेन पॉवेल महांकुभमध्ये कल्पवासात १० दिवस घालवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी भारतीय ऋषीमुनींच्या सहवासात राहून त्या सनातन, अध्यात्म व भारतीय संस्कृती याविषयी जाणून घेतील.
स्टीव्ह जॉब्सचीही भारतीय संतांवर श्रद्धा होती. बाबा नीम करौली यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. त्यांना ते आपले गुरु मानत. १९७० च्या दशकात ते ७ महिन्यासाठी भारतात आले होते.