प्रयागराज महाकुंभमधून चर्चेत आलेल्या मोनालिसाचे नशीब असे बदलले की ती आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ज्याचे चित्रीकरण लंडनमध्ये होईल. म्हणजेच आता ती अभिनेत्री बनली आहे.
दिग्दर्शक सनत मिश्रा स्वतः मध्य प्रदेशातील महेश्वर येथे पोहोचले आणि मोनालिसाच्या कुटूंबियांना भेटले. त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपट 'मणिपूर डायरी' मध्ये काम करण्याची ऑफर दिली.
मोनालिसाला प्रथम मुंबईत तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल आणि नंतर तिच्यासोबत चित्रीकरण सुरू होईल. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण लंडनमध्ये होईल.
चित्रपटात मोनालिसाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे. ती एका आर्मी ऑफिसरच्या मुलीची भूमिका साकारणार आहे.