धर्मेंद्रची मुलगी ईशा देओलने बॉलीवुडमध्ये २३ वर्षे पूर्ण केली आहेत. २००२ मध्ये 'कोई मेरे दिल से पूछे' या चित्रपटातून तिने पदार्पण केले.
ईशा देओलचा पहिला चित्रपट ११ जानेवारी २००२ रोजी प्रदर्शित झाला. मात्र, तिचा हा चित्रपट मोठा अपयश ठरला. या चित्रपटात संजय कपूर आणि आफताब शिवदासानी मुख्य भूमिकेत होते.
धर्मेंद्र यांना त्यांच्या घरातील कोणतीही मुलगी चित्रपटात काम करावी असे वाटत नव्हते. पण ईशा देओल हट्ट करून अभिनेत्री बनली तेव्हा वडिलांनी सहा महिने बोलणे बंद केले होते.
अपयशी पदार्पणानंतरही ईशाला चित्रपटांच्या ऑफर्स येत राहिल्या. ती अनेक चित्रपटांत दिसली पण स्वतःच्या बळावर एकही चित्रपट हिट करू शकली नाही.
ईशा देओलने सलमान खान, ऋतिक रोशन, अक्षय कुमार, अजय देवगन, संजय दत्त, अनिल कपूर यांच्यासारख्या अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले, पण त्याचाही तिला फारसा फायदा झाला नाही.
ईशा देओलने 'क्या दिल ने कहा', 'युवा', 'धूम', 'काल', 'दस', 'मैं ऐसा ही हूं','नो एंट्री', 'जस्ट मैरिड', 'प्यारे मोहन', 'इंसान' अशा चित्रपटात काम केले.
सलग अपयशानंतर ईशा देओलने अभिनयातून ब्रेक घेतला. २००८ नंतर तिने २०११ मध्ये पुनरागमन केले आणि चित्रपट केले. मात्र, पुनरागमनही फारसे यशस्वी झाले नाही.