या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला बॉलीवूड चित्रपटांच्या त्या गाण्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यावर निर्मात्यांनी करोडो रुपये खर्च केले आणि या गाण्यांना सर्वात महागडे गाणे म्हटले जाते.
दीपिका पदुकोण-रणवीर सिंग यांच्या पद्मावत चित्रपटातील घूमर हे गाणे खूप प्रसिद्ध झाले होते. याच्या शूटिंगसाठी निर्मात्यांनी जवळपास 12 कोटी रुपये खर्च केले होते.
रजनीकांत-अक्षय कुमार यांच्या 2.0 चित्रपटातील यंथारा लोकापु सुंदरीवे... हे गाणेही खूप चर्चेत होते. हे गाणे तयार करण्यासाठी निर्मात्यांना सुमारे 20 कोटी रुपये खर्च करावे लागले.
अक्षय कुमारच्या बॉस या चित्रपटातील पार्टी ऑल नाईट. हा डान्स खूप आवडला होता. या गाण्यात सोनाक्षी सिन्हा व्यतिरिक्त 600 विदेशी मॉडेल्सही होत्या. या गाण्यासाठी जवळपास 6 कोटी खर्च केले
दीपिका पदुकोणच्या रामलीला या चित्रपटात प्रियांका चोप्रावर 'राम चाहे लीला' हा आयटम नंबर शूट करण्यात आला होता. या गाण्याच्या शूटिंगसाठी 6 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
कतरिना कैफ-आमिर खान यांच्या 'धूम 3' चित्रपटातील मलंग या गाण्याच्या शूटिंगवर सुमारे 5 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. 200 विदेशी जिम्नॅस्टही या गाण्याचा भाग होते.
हृतिक रोशन-ऐश्वर्या राय यांच्या जोधा अकबर या चित्रपटातील अझीम ओ शान शहेनशाह या गाण्यासाठी 2.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यात 400 डान्सर्स आणि 2000 साइड आर्टिस्ट दिसले.
शाहरुख खान-करीना कपूरच्या रा.वन चित्रपटातील छमक छल्लो या गाण्यासाठी ३ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. हे गाणे हॉलिवूड गायक एकोनने गायले आहे.
शाहरुख खानच्या जवान या चित्रपटातील जिंदा बंदा या गाण्याच्या चित्रीकरणासाठी १५ कोटी रुपये खर्च आला होता. या गाण्यात 1 हजार बॅकग्राउंड डान्स होते.