रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी गोव्यात आनंद कारज आणि सिंधी रीतिरिवाजांनुसार लग्न केले. त्यामुळे हे या जोडप्याचा पहिला व्हॅलेंटाईन आहे.
एकमेकांना डेट केल्यानंतर, पुलकित सम्राट आणि कृति खरबंदा यांनी १५ मार्च २०२४ रोजी गुरुग्राममध्ये लग्न केले. या वर्षी हे जोडपे लग्नानंतर पहिल्यांदाच व्हॅलेंटाईन डे साजरा करेल.
तापसी पन्नूने बॅडमिंटन खेळाडू मॅथियास बोशी २३ मार्च २०२४ रोजी उदयपूरमध्ये गुप्तपणे लग्न केले. या लग्नात फक्त जोडप्याचे कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
सोनाक्षी सिन्हाने २३ जून २०२४ रोजी मुंबईत जहीर इकबालशी भव्य लग्न केले. त्यामुळे लग्नानंतर हे जोडपे पहिल्यांदाच एकत्र व्हॅलेंटाईन डे साजरा करेल.
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी १६ सप्टेंबर २०२४ रोजी तेलंगणातील ४०० वर्षे जुन्या श्री रंगनायकस्वामी मंदिरात लग्न केले. त्यामुळे हे या जोडप्याचा पहिला व्हॅलेंटाईन आहे.
साउथचे सुपरस्टार नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी ४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबादमध्ये लग्न केले आहे.