जानेवारी २०२४ मध्ये रिलीज झालेल्या 'फायटर' मध्ये हृतिक शेवटचा दिसला होता. त्यामुळे चाहते त्याच्या पुढच्या चित्रपटांची वाट पाहत आहेत. त्याच्या आगामी चित्रपटांची यादी पाहूया
या चित्रपटांशिवाय हृतिक रोशन 'द रोशन्स' या सिरीजमधून पदार्पण करणार आहे. ही डॉक्यू-सीरीज १७ जानेवारी रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे
हृतिक रोशन 'वॉर २' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
'क्रिश ४' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट २०२६ पर्यंत प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे.
आलिया भट्टच्या अल्फा या चित्रपटात हृतिक रोशनचा कॅमिओ दिसणार आहे. हा चित्रपट २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.