वर्ष 2000 मध्ये रिलीज झालेला मराठा बटालियन सिनेमा येत्या प्रजासत्ताक दिनावेळी पाहू शकता. या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण यांच्यासह अन्य दिग्गज मंडळींनी भूमिका साकारलीये.
योद्धा सिनेमाची कथा एका पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमात शर्मिष्ठा राऊत, प्रिया बेर्डे आणि अन्वय बेर्डे यांनी भूमिका साकारल्या आहेत.
स्वातंत्र्यसैनिक शिवराम हरी शिवगुरू यांच्या जीवनावर आधारित क्रांतीवीर राजगुरू सिनेमा तयार करण्यात आला आहे. यामध्ये चिन्मय मांडलेकरने मुख्य भूमिका साकारली आहे.
अभिनेता सुबोध भावेच्या मुख्य भूमिकेतील लोकमान्य एक युगपरूष सिनेमा प्रजासत्ताक दिनावेळी पाहू शकता. यामध्ये लोकमान्य टिळकांचे विचार चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
वर्ष 2008 मध्ये प्रदर्शित झालेला वासुदेव बळवंत फडके सिनेमा 18 व्या शतकातील काळावर आधारित आहे. या सिनेमात अजिंक्य देवने मुख्य भूमिका साकारली आहे.