Jagdeep Dhankhar Resigns: आरोग्य कारणास्तव आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतींना पत्र लिहून त्यांनी राजीनाम्याची माहिती दिली़.
- Home
- India
- 21st July 2025 Updates: Jagdeep Dhankhar Resigns - मोठा निर्णय! उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा तडकाफडकी राजीनामा; आरोग्याला दिलं प्राधान्य
21st July 2025 Updates: Jagdeep Dhankhar Resigns - मोठा निर्णय! उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा तडकाफडकी राजीनामा; आरोग्याला दिलं प्राधान्य

21st July 2025 Updates : आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. याशिवाय चंदन मिश्राच्या हत्येतील चार आरोपींना कोलकाता येथून अटक करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात सकाळ सकाळ पावसाच्या तुरळक सरी पडत असल्याची स्थिती आहे. अशातच ताज्या घडामोडींसाठी एशियानेट न्यूज मराठीचे अपडेट्स एका क्लिकवर वाचा...
21st July 2025 Updates Jagdeep Dhankhar Resigns - मोठा निर्णय! उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा तडकाफडकी राजीनामा; आरोग्याला दिलं प्राधान्य
21st July 2025 Updates ICG Assistant Commandant Bharti 2025 - भारतीय तटरक्षक दलात 170 अधिकाऱ्यांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरू
ICG Assistant Commandant Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट CGCAT 2027 बॅचसाठी १७० पदांची भरती जाहीर. जनरल ड्यूटी आणि टेक्निकल पदांसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
21st July 2025 Updates Satara Crime - एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीच्या गळ्यावर चाकू; लोकांनी दाखवले धैर्य, मुलीचा जीव वाचला!
Satara Shocking Incident : साताऱ्यात एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी धाडस दाखवून मुलीचा जीव वाचवला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
21st July 2025 Updates Dr. Nilesh Sabale Entry On Star Pravah - ‘नमस्कार मी डॉ. निलेश साबळे…’ आता स्टार प्रवाहवर! 'चला हवा येऊ द्या'च्या माजी सूत्रसंचालकाची नवी धमाकेदार एन्ट्री
Dr. Nilesh Sabale Entry On Star Pravah : ‘चला हवा येऊ द्या’ फेम निलेश साबळे आता स्टार प्रवाहवरील ‘शिट्टी वाजली रे’ मध्ये दिसणार आहेत. झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’चा नवा पर्व सुरू होत असताना निलेशची अनुपस्थिती प्रेक्षकांना खटकणार आहे.
21st July 2025 Updates Eknath Khadse - हनीट्रॅप प्रकरणात नवा ट्विस्ट! एकनाथ खडसेंचे प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजनांवर थेट आरोप, वाचा A ते Z खुलासे
Eknath Khadse : भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय प्रफुल्ल लोढा यांना अटक झाल्यानंतर, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. खडसेंनी एसआयटीमार्फत तपासाची मागणी केली आहे.
21st July 2025 Updates Ladki Bahin Yojana - ‘लाडकी बहीण’ योजनेचा जुलैचा हप्ता कधी येणार?, महिलांमध्ये वाढली उत्सुकता
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा महिलांना आहे. जून महिन्याचा हप्ता उशिरा मिळाल्याने जुलैमध्ये असेच होईल का अशी शंका आहे. योजनेला १ वर्ष पूर्ण झाले असून, लाखो महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे.
21st July 2025 Updates ED Summons - ईडीने राणा, प्रकाश राज, विजय देवरकोंडा, मांचू लक्ष्मींना बजावले समन्स
ईडीने तेलुगू कलाकार राणा दग्गुबाती, प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि मांचू लक्ष्मींना बेकायदेशीर सट्टेबाजी प्रकरणात समन्स बजावले आहे.
21st July 2025 Updates Shloka Mehta bracelet - अंबानींची सून, घालते हे ब्रेसलेट, जाणून घ्या याची खासियत
मुंबई - अंबानी घराण्याची मोठी सून श्लोका नेहमीच फॅशनच्या बाबतीत ट्रेंड सेट करते. तिचे कपडे, दागिने, घड्याळं आणि हँडबॅग्जचं कलेक्शन नेहमीच चर्चेत असतं.
21st July 2025 Updates AI Facial Recognition At Railway Station - महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल, AI Facial Recognition प्रणाली रेल्वे स्थानकांवर बसवणार
महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने सात प्रमुख रेल्वे स्थानकांवर AI आधारित फेसियल रेकग्निशन प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नवी दिल्लीसारख्या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे.
21st July 2025 Updates Post Office NSC Scheme - पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करून ५ लाखांपर्यंत व्याज कमवा
मुंबई - पैसे कमवणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते योग्य प्रकारे व्यवस्थापित करणेही महत्त्वाचे आहे. कोणत्याही जोखमीशिवाय व्याज मिळवण्यासाठी अनेक योजना आहेत. अशाच एका पोस्टाच्या योजनेबद्दल जाणून घेऊया.
21st July 2025 Updates Richest Corporations In Maharashtra - मुंबई महापालिका सर्वात श्रीमंत, जाणून घ्या राज्यातील इतर महापालिकांचे बजेट आहे तरी किती
मुंबई - मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे तर महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईत एकूण ९ महापालिका आहेत. त्यात बीएमसी सर्वांत श्रीमंत आहे. राज्यात इतर महापालिकांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडचे बजेट जास्त आहे. जाणून घ्या इतर महापालिकांची माहिती...
21st July 2025 Updates केरळचे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि माजी मुख्यमंत्री वी. एस. अच्युतानंदन यांचे निधन
२३ जून रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते आयसीयू मध्ये जीवनरक्षक औषधांवर उपचार घेत होते.
21st July 2025 Updates Chhagan Bhujbal Vs Sanjay Raut - ''आता आम्ही सुद्धा घरी चाललोय!'', "चार मंत्री घरी जाणार"; या संजय राऊतांच्या ट्विटला भुजबळांचा टोला
Chhagan Bhujbal Vs Sanjay Raut : संजय राऊत यांच्या 'चार मंत्री घरच्या वाटेला' या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. छगन भुजबळांनी यावर मिश्किल टोला लगावला असून, 'आता आम्ही सुद्धा घरी चाललोय,' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
21st July 2025 Updates Mumbai Airport - मुंबई विमानतळावर एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरुन घसरले, सर्व प्रवासी सुखरुप
ही घटना सकाळी ९:२७ वाजता घडली. विमान उतरत असताना मुंबईतील जोरदार पावसामुळे धावपट्टी ओलसर व निसरडी झाल्याने हे "रनवे एक्सकर्शन" घडलं.
21st July 2025 Updates Mumbai Bomb Blast 2006 - 19 वर्षांनंतर सर्व 12 आरोपी निर्दोष मुक्त, वाचा या १९ वर्षात कसा राहिला या केसचा प्रवास
मुंबई - ११ जुलै २००६ रोजी सायंकाळी मुंबईत लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोटांनी शहर हादरवून टाकलं. ११ मिनिटांत सात स्फोट घडवण्यात आले, ज्यात १८९ जणांचा मृत्यू झाला आणि शेकडो गंभीर जखमी झाले. वाचा या केसचा १९ वर्षांतील प्रवास.
21st July 2025 Updates Mumbai Bomb Blast 2006 - त्यानंतर मी लोकलने प्रवास करु शकलो नाही, २००६ नंतर कधीही उभे राहू न शकलेल्या सीएची हृदयस्पर्शी खंत
मुंबई - २००६ मध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटातून जीवंत बचावलेले चिराग चौहान आजही लोकल ट्रेनचा उल्लेख ऐकताच भावूक होतात. सीए चौहान यांचे आयुष्य या स्फोटाने कायमचे बदलून टाकले. पण त्यांनी मेहनतीच्या जोरावर यश मिळवून दाखवलेच.
21st July 2025 Updates NEET UG Counselling 2025 साठी आजपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज आणि वाचा महत्वाच्या तारखा
वैद्यकीय महाविद्यालयात एडमिशनसाठी MCC काउंसिलिंग प्रक्रिया 21 जुलैपासून सुरू होत आहे. NEET UG 2025 मध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी या काउंसिंगमध्ये सामील होऊ शकतात.
21st July 2025 Updates Mumbai Crime - वैमानिकाचा हवाईसुंदरीवर बलात्कार, हॉंगकॉंगला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या वैमानिकाला मुंबई विमानतळावर अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला अति मद्यपान करायला लावून मीरा रोड येथील आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
21st July 2025 Updates मुंबई ट्रेन साखळी बॉम्बस्फोट प्रकरण - 12 आरोपींची निर्दोष सुटका, कोर्टाने 19 वर्षांनंतर सुनावला निकाल
मुंबईत 11 जुलै 2006 मध्ये झालेल्या ट्रेनमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. खरंतर, या बॉम्बस्फोटात जवळजवळ दोनशेहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
21st July 2025 Updates Honda Activa 6G - केवळ ५००० रुपयांत मिळवा Honda Activa 6G स्कूटर!
मुंबई - होंडा अॅक्टिवा ६G विश्वासार्हतेसाठी, इंधन कार्यक्षमतेसाठी आणि वापरण्यास सोप्या वैशिष्ट्यांसाठी ओळखली जाते. प्रति लिटर ५९.५ किमी मायलेजसह, ही स्कूटर बजेटमध्ये बसणारा चांगला पर्याय आहे. यात विविध प्रकार आणि आकर्षक फायनान्स योजना उपलब्ध आहेत.