तू काळा आहेस, बिग बॉसमध्ये प्रणित मोरेचं बोलणं ऐकून वाटेल मी याचाच शिकार
डेंग्यूवर मात करून बिग बॉस १९ च्या घरात परतलेल्या प्रणित मोरेने एक भावनिक खुलासा केला आहे. लहानपणी त्याला त्याच्या रंगावरून कसे हिणवले जायचे आणि या गोष्टीचा त्याच्या मनावर किती खोल परिणाम झाला, हे त्याने सांगितले.

तू काळा आहेस, बिग बॉसमध्ये प्रणित मोरेचं बोलणं ऐकून वाटेल मी याचाच शिकार
बिग बॉस १९ च्या घरात प्रणित मोरेची परत एकदा एंट्री झाली आहे. डेंग्यू झाल्यामुळे प्रणितला काही दिवस मेडिकलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानं बरं वाटायला लागल्यानंतर परत एकदा बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे.
प्रणित कॉमेडियन म्हणून होता सर्वांना माहित
प्रणित कॉमेडियन म्हणून सर्वांना पहिल्यापासून माहित होता. युट्युबवर गेल्यानंतर त्याचे अनेक व्हायरल व्हिडीओ दिसून येतात. पण आता त्याच प्रणितने एक वेगळी बाजू प्रेक्षकांच्या पुढं आणली आहे.
लहानपणी रंगावरून ऐकाव्या लागल्या अनेक गोष्टी
लहानपणी आपल्याला रंगावरून अनेक गोष्टी ऐकाव्या लागल्याचं प्रणितने म्हटलं आहे. त्याला लहानपणी तू डार्क आहेस असं म्हणून चारचौघांमध्ये हिणवलं गेलं. त्यामुळं तो बोलताना भावुक झाल्याचं दिसून आलं.
प्रणितला काय म्हणायचे?
प्रणितला म्हणायचे की, "मी जेव्हा छोटा होता तेव्हा मला म्हणायचे तू डार्क ( काळा ) आहेस, त्यामुळे तू कुठेतरी कमी आहेस. सगळे चिडवायचे. ही गोष्ट माझ्या हातात नाही त्यासाठी मला बोललं जात आहे हे कळलं तेव्हा मला खूप वाईट वाटायचं."
गप्प बसलो तर लोक असेच बोलत बसणार
"एका काळानंतर मला कळलं की मी जर गप्प बसलो तर लोक मला असेल बोलत राहणार. त्यामुळे पहिल्यापासूनच अशी काही उत्तर द्यायचो ज्यामुळे तेही शांत बसतील."
प्रणित काय म्हणाला?
"हेच कारण आहे, तुम्ही या शोमध्येही जर बघितलं असेल तर मी कधीच कोणाचं बॉडी शेमिंग केलेलं नाही की कधी कोणाला वाईट वाटेल असं बोललेलो नाही. कारण मला माहिती आहे की या गोष्टी एखाद्याच्या मनात किती खोल लागू शकतात."
